पहिले विमान सप्टेंबर अखेरपर्यंत उडणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 15, 2025
- 209
पहिल्या टप्याचे काम 94 टक्के पूर्ण ; तिसरी धावपट्टी बांधण्याचे संकेत
नवी मुंबई : सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना देशातील सर्वाधिक पॅकेज देऊन त्यांचे पुनर्वसन केले. यामुळे पूर्वी ज्या चार गावांनी या विमानतळाला विरोध केला त्या चार गावातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या जमिनीसह घरांचे पुनर्वसन करण्याची मागणी सरकारकडे केल्यामुळे राज्य सरकार या चार गावांतील कुटूंबियांचे पूनर्वसन करुन त्या जागेवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भविष्यातील तिसरी धावपट्टी बांधण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नवी मुंबई येथे दिली.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आ. प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, महेश बालदी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल, गणेश देशमुख, डॉ. राजा दयानिधी व इतर अधिकारी उपस्थित होते. विमानतळ कामाच्या पाहणीनंतर अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनंतर मुख्यमंत्र्यांनी या विमानतळातून पहिले विमान सप्टेंबर अखेरपर्यंत उडणार असे यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या विमानतळाच्या पहिल्या टप्याचे काम 94 टक्के पूर्ण झाले असून दररोज 13 हजार कर्मचारी या विमानतळाचे काम पुर्ण करण्यासाठी दिवसरात्र झटत असल्याने अदानी समुह आणि सिडको महामंडळाने दुप्पट मजूर लावून हे पुढील 80 दिवसात विमानतळाचे काम पुर्ण करावे अशाही सूचना यावेळी अदानी समुहाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या विमानतळ प्रकल्पाचे इंटेरीयरचे काम अंतिम टप्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगभऱातील सर्वच विमानतळांच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळातील प्रवाशांची विमानापर्यंत बॅग पोहचविणारी व्यवस्था ‘बॅग क्लेम सिस्टीम’ विकसित केली जाणार आहे. ही जगातील सर्वाधिक वेगवान व सूरक्षित आणि स्वंयचलित पद्धतीची असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. विमानतळ प्रकल्पातील बोर्डींग पासची यंत्रणा पूर्ण झाल्याने विमानतळ व्यवस्थापनाने यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांना विमानतळातील बोर्डींग पास रंगित तालिम म्हणून काढून दाखविला.
- तिसऱ्या धावपट्टीचे संकेत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये दोन धावपट्टीचे नियोजन होते. त्यामधील पहिली 3700 मीटर लांबीची एक धावपट्टी बांधून तयार आहे. या पहिल्या धावपट्टीची वेगवेगळी चाचणी व परीक्षण घेऊन तीच्यावर विमानांचे यशस्वी उड्डाणाचा सराव घेण्यात आला आहे. दूसया धावपट्टीचे काम काही प्रमाणात सुरू आहे. 2027 पर्यंत दूसरी धावपट्टीचे काम पुर्ण करण्यासाठी सिडको मंडळ आणि अदानी समुहाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी अंतिम टप्यात याच विमानतळातील तिसरी धावपट्टी बांधण्याचे संकेत शनिवारी दिल्यामुळे मागील अनेक वर्षात विमानतळ गाभा क्षेत्रालगतच्या पारगाव, दापोली, खालचे ओवळे, भंगारपाडा, कुंडेवहाळ या गावातील गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विमानतळाच्या नूकसान भरपाईच्या पुनर्वसन पॅकेजमध्ये या गावांतील कुटूंबांना साडेबावीस टक्के विकसित भूखंडासोबत घरासह इतर जागेची नूकसान भरपाई मिळणार आहे.
महत्त्वाचे टप्पे:
- दि. 10 जून 2022 रोजी संपूर्ण 1160 हेक्टर जागेवर 100% प्रवेश व मार्गाधिकार सिडकोमार्फत ला हस्तांतरित
- सिडकोकडून सुमारे 2000 कोटींच्या पुनर्वसन आणि भूसंपादनाचे काम पूर्ण
- दि. 29 मार्च 2022 रोजी ने वित्तीय ताळेबंदी साध्य केली; कडून 12,770 कोटींचा निधी मंजूर
- सिडकोतर्फे 1160 हेक्टर क्षेत्रामध्ये 5.5 मीटरपर्यंत भूविकास
- उलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण
- दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी -295 विमानाचे उदघाटन लँडिंग, -30 ने 2 लो पास
- दि. 29 डिसेंबर 2024 रोजी इंडिगो 320 विमानाने पहिले व्यावसायिक लँडिंग
- दि. 30 जून 2025 पर्यंत या प्रकल्पाने एकूण 96.5% भौतिक प्रगती
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai