वाहतुकीचे प्रबोधनव हेल्मेट वाटप
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 43
उरण ः राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या उपक्रमांतर्गत नाव्हाशेवा वाहतूक शाखा आणि खउखउख ङेालरीव व सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या संयुक्त तत्वावधानात एक महत्त्वपूर्ण वाहतुकीचे प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 100 हेल्मेट च वाटप करून वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आणि हेल्मेट वाटपाच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्यात आले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक व. पो.नि. वैशाली गलांडे , खउखउख ङेालरीव व सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या वतीने विनय बर्वे, रेश्मा पट्टम, प्रशांत उपहार यांनी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत सविस्तर माहिती दिली. प्रबोधन कार्यक्रमात निम्नलिखित वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देण्यात आली तसेच हेल्मेट वापराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमात सुमारे 100 ते 129 नागरिकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूक करणे आणि त्यांना सुरक्षित वाहतुकीच्या पद्धती शिकवणे हा होता. खउखउख ङेालरीव व सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या सहकार्याने राईड टू सेफ्टी हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या नाव्हाशेवा वाहतूक शाखा आणि खउखउख ङेालरीव व सेवा सहयोग फाऊंडेशन नवी मुंबई यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे सर्वांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती मिळाली आणि त्यांना सुरक्षित वाहतुकीच्या पद्धती शिकवल्या गेल्या. या कार्यक्रमाचा परिणाम म्हणून नागरिक भविष्यात सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पालन करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.
1. अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कोणीही वाहन चालवू नये. 2. अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लर्निंग लायसन मध्ये कोणीही डबल सीट वाहन चालवणार नाही अगर चालवल्यास पक्का लायसनधारक पाठीमागे बसलेला असावा. 3. आपण किंवा आपले आई-वडील वाहन चालवीत असताना हेल्मेट घालणे बाबत सूचना द्याव्या तसेच फोरविलर असेल तर सीट बेल्ट लावणे बाबत सूचना द्याव्या. 4. सिग्नल जंप कोणीही करू नये. 5. ट्रिपल सीट कोणीही जाणार नाही. 6. राँग साईड वाहन चालवणार नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai