शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनतर्फे मासिक पाळी स्वच्छता जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 24, 2026
- 26
शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय, नवीन सेवा, ता. उरण येथे किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मुलींना मासिक पाळीविषयी शास्त्रीय व सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान मासिक पाळीची प्रक्रिया, पाळीचे चक्र, तसेच वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच पाळीच्या काळात योग्य आहाराचे महत्त्व, लोहयुक्त अन्नपदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे, पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे, तसेच जंक फूड टाळणे, संतुलित आहार घेणे आणि शरीराची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मासिक पाळीविषयी समाजात प्रचलित असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा यावरही चर्चा करण्यात आली. पाळीच्या काळात काही गोष्टी करू नयेत, देवपूजा करू नये, स्वयंपाकघरात जाऊ नये अशा चुकीच्या समजुतींना शास्त्रीय आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या चर्चेमुळे विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण झाली. पुनर्वापर करता येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनच्या वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. हे नॅपकिन आर्थिकदृष्ट्या परवडणारे, पर्यावरणपूरक व दीर्घकाळ वापरता येण्यासारखे असल्याचे सांगण्यात आले. ‘प्रोजेक्ट बाला’ अंतर्गत गरजू व वंचित विद्यार्थिनींना मोफत पुनर्वापरयोग्य सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थिनींनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढल्याची भावना व्यक्त केली. शाळेचे मुख्याध्यापक संतोष म्हात्रे यांनी शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थिनींच्या आरोग्य व सक्षमीकरणासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे नमूद केले. फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजणे यांनी स्वयंसेवक भैरवी दर्णे, आयेशा कोया, सोहम वार्डे, तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचे आभार मानले. भविष्यात शाळेतील मुलींसाठी आणखी उपयुक्त उपक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या उपक्रमामुळे उरण परिसरातील मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता वाढून स्वच्छता व आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाल्याचे दिसून आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai