पनवेल पालिकेचा 4853 कोटींचा अर्थसंकल्प
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 19
आयुक्तांकडून स्थायी समितीस सादर
पनवेलः महापालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे 10 लाख रुपये शिलकीचे आणि 4 हजार 853 कोटींचे अंदाजित जमा व खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांनी स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्याकडे सादर केले. या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देत पायाभूत सुविधा विकास, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण तसेच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
सन 2026-2027 च्या अंदाजपत्रकानूसार जमा खर्चाच्या बाबींचा तपशील पहाता एकुण जमा रूपये 4 हजार 853 कोटी 90 लाख (आरंभी शिलकी सह) इतके असून एकुण खर्च रूपये 4 हजार 853 कोटी 80 लाख इतका आहे. अखेर शिल्लक रूपये 10 लाख इतकी आहे. खर्चाच्या बाबतीत आस्थापना खर्चासाठी 193 कोटींची तरतूद करण्यात आली असून, नविन प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल 200 कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत. शहरातील होल्डिंग पॉन्डसाठी 60 कोटी, तसेच बहुउद्देशीय समाजमंदिर बांधकामासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करत दैनंदिन बाजार विकसित करण्यासाठी 64 कोटी, गावठाण परिसरातील पायाभूत सुविधांसाठी 61 कोटी, तसेच घनकचरा संकलन,वाहतूक व मनुष्यबळ व इतर अनुषंगिक बाबी यांच्यासाठी 318 कोटींची मोठी तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय व आरोग्य सेवांसाठी 194 कोटी, अग्निशमन व सुरक्षा व्यवस्थेसाठी 83 कोटी, तसेच रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरणासाठी 358 कोटींचा निधी प्रस्तावित आहे. शिलार धरण प्रकल्पासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मलनिस्सारण व पाणी पुर्नवापर प्रक्रिया केंद्र व इतर कामांसाठी 115 कोटींची तरतूद, विद्युत व्यवस्थेसाठी 147 कोटी, भुयारी गटार व मलनिस्सारणासाठी 164 कोटी , शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शिक्षणासाठी 174 कोटी, माहिती व तंत्रज्ञानासाठी 143 कोटी, तसेच शासकीय अमृत योजनेअंतर्गत विविध विकासकामांसाठी 117 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय भूसंपादन, सार्वजनिक सुविधा आणि नगररचना यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी प्रस्तावित आहे. यावेळी अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, लेखा अधिकारी संग्राम व्होरकाटे, स्थायी समितीचे सर्व सदस्य, उपमुख्यलेखा परीक्षक संदिप खुरपे उपस्थित होते. जमेची बाजू
- आरंभी शिल्लक 1,362 कोटी
- मालमत्ता कर 1,952 कोटी
- यूडीसीपीआर व विकास शुल्क 159 कोटी
- वस्तू व सेवा कर अनुदान 548 कोटी
- 1 टक्के मुद्रांक शुल्क अनुदान 30 कोटी
- 15 वा वित्त आयोग 30 कोटी
- पीएम आवास योजना 50 कोटी
- अमृत वाढीव पाणीपुरवठा योजना अनुदान 117 कोटी
- इतर अनुदाने व भांडवली जमा 349 कोटी
- इतर करेत्तर महसूल 37 कोटी
- व्याजापोटीची रक्कम 157 कोटी 90 लाख
- असाधारण लेखे व इतर परतावे 62 कोटी
अशी आहे तरतूद
- आस्थापना खर्च 193 कोटी
- नवीन प्रशासकीय इमारत 200 कोटी
- होल्डिंग पॉण्ड 60 कोटी
- बहुउद्देशीय समाजमंदिर 40 कोटी
- रोज बाजार विकसित करणे 64 कोटी
- गावठाणीतील पायाभूत सुविधा 61 कोटी
- घनकचरा संकलन, वाहतूक व मनुष्यबळ 318 कोटी
- वैद्यकीय-आरोग्य सेवा -194 कोटी
- अग्निशमन व सुरक्षा व्यवस्था 83 कोटी
- रस्त्यांचे काँक्रीटीकरण-डांबरीकरण 358 कोटी
- शिलार धरण प्रकल्प 150 कोटी
- मलनिस्सारण व पाणी पुर्नवापर प्रक्रिया केंद्र 115 कोटी
- विद्युत व्यवस्था 147 कोटी
- भुयारी गटार व मलनिस्सारण 164 कोटी
- प्राथमिक शिक्षण 174 कोटी
- माहिती व तंत्रज्ञान 143 कोटी
- अमृत योजनेअंतर्गत विविध विकासकामे 117 कोटी
वाढीव तरतूद
- दिव्यांग कल्याण 15 कोटी
- प्राथमिक शिक्षण 110 कोटी
- वैद्यकीय आरोग्य 89 कोटी
- पाणीपुरवठा व्यवस्था 142.5 कोटी
- घनकचरा व्यवस्थापन 27 कोटी
- अग्निशमन व सुरक्षा व्यवस्थापन 36 कोटी
- महिला व बालकल्याण 10 कोटी
- समाजविकास व मागासवर्गीय कल्याण 18 कोटी
पनवेल महापालिकेने सादर केलेला अर्थसंकल्प शहराच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यांचा समतोल साधत विकासाला चालना देणारे ठरणार आहे.- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai