मालमत्ता कर वसुलीत 700 कोटींचा टप्पा पार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 16
पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनाने यंदा मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 700 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. थकीत कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेमुळे ही विक्रमी वसुली शक्य झाली. गेल्या नऊ वर्षांत महापालिकेचा थकीत मालमत्ता कर 1700 कोटी रुपयांवर पोहोचला होता.
मंगळवारी स्थायी समितीमध्ये सादर झालेल्या 2026-2027 च्या अंदाजपत्रकानुसार महापालिकेची उलाढाल पाच हजार कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचली. वार्षिक मालमत्ता कराची मागणी 312 कोटी रुपये असताना, प्रशासकीय राजवटीत लागू केलेल्या शास्ती माफीच्या अभय योजनेमुळे मागील आर्थिक वर्षात तब्बल 701 कोटी रुपये म्हणजे दुपटीची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली मानली जात आहे. या दरम्यान महापालिकेच्या ठेवी 1600 कोटी रुपयांवर गेल्या असून, मागील वर्षी एकूण 2,060 कोटी रुपयांची आवक झाली. यामध्ये अभय योजनेचा मोठा वाटा आहे. दुसरीकडे, विविध विकासकामांवर सुमारे 2700 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, बांधकाम विभागासाठी करण्यात आलेल्या 1629 कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी केवळ 910 कोटी रुपयांचीच कामे पूर्ण झाली, म्हणजेच सुमारे 48 टक्के निधी खर्च न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पनवेल महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांनी सुरुवातीलाच आस्थापना खर्चावर मर्यादा आणली. तसेच महापालिकेने मागील वर्षी राबवलेल्या मालमत्ता कराच्या शास्तीवरील अभय योजनेमुळे यावर्षी महापालिकेला करापोटी 700 कोटी रुपये वसूल करता आले. महापालिका यापुढेही हाती घेतलेले विकास प्रकल्प पूर्ण करण्यासोबत थकीत मालमत्ता कर वसुलीला प्राधान्य देणार आहे.- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai