गणनापत्राची ऑनलाईन सुविधा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 10, 2026
- 28
एसआयआर कामाला वेग
नवी मुंबई ः भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआर प्रोग्रम सुरू असून या अंतर्गत 30 जूनपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन गणनापत्रे भरून घेत आहेत. या कामाला आता वेग आला असून या कामासाठी नियुक्त बीएलओ यांचेमार्फत प्रत्येक नोंदीत मतदारास दोन प्रतींमध्ये गणनापत्र देण्यात येत असून या गणनापत्रामध्ये माहिती भरून व स्वाक्षरी करून एक प्रत मतदारांनी बीएलओ यांचेकडे परत द्यायची आहे व दुसरी प्रत बीएलओची स्वाक्षरी घेऊन पोहोच म्हणून आपल्याकडे ठेवायची आहे.
बीएलओ या कामाकरिता 3 वेळा प्रत्येक घरी येणार असून काही कुटुंबातील पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असल्यास त्यांना गणनापत्र ऑनलाईन भरण्याचीही महत्वाची सुविधा उपलब्ध आहे. सुशिक्षितांचे शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबई शहरातील तंत्रस्नेही नागरिक या ऑनलाईन गणनापत्रे भरण्याला जास्तीत जास्त प्रतिसाद देतील अशा विश्वास व्यक्त केला जात आहे. याकरिता हीींंीि:/र्/ेीींंशीी.शलळ.र्सेीं.ळप/ या सिटीझन सर्व्हिस पोर्टलवर जाऊन मतदार आपले गणनापत्र घरबसल्या ऑनलाईन भरू शकतात. मतदार याद्यांची अचूकता, पारदर्शकता व अद्ययावतपणा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदार यादीत नाव राहण्यासाठी मतदाराचे मॅपींग होणे अत्यावश्यक आहे. योग्य मतदारांचीच नावे मतदारयादीत राहिल्याने मतदार यादी शुध्द होणार असून प्रत्येक नागरिकाने यामध्ये राष्ट्रीय जबाबदारी समजून सहभागी व्हावे तसेच सर्व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटीमध्ये बीएलओ यांना प्रवेश देऊन व त्यांना सर्व सदस्यांची गणनापत्रे भरून मिळण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai