रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मागणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 20
उरण ः खोपटा कोप्रोली चिरनेर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथील कार्यालयात कार्यकारी उपअभियंता डी एम पाटील यांची भेट घेऊन या समस्या सोडविण्याची मागणी केली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने 20 जुलै रोजी कार्यकारी उपअभियंता डी एम पाटील यांची भेट घेतली. यावेळी खोपटा कोप्रोली चिरनेर रस्त्यावरील खड्डे त्वरित भरणे, जुना खोपटा पुलाची दुरुस्ती कामाला गती देऊन वाहतुकीस खुला करणे, या रस्त्याला आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवणे अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय खोपटा कोप्रोली कलंबुसरे चिरनेर येथील पाण्याचा नीट निचरा न होणाऱ्या मोऱ्यांची दुरुस्ती करणे, काही ठिकाणी नवीन छोटे पूल (बॉक्स कलवर्ट) उभारणे आदिची मागणी केली. याबाबत नव नियुक्त उप कार्यकारी अभियंता डी एम पाटील यांनी तातडीने कार्यवाही करण्याबाबत विभागाला सूचना केल्या. मोऱ्यांच्या कामासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून कार्यवाही करण्याचे अभिवचन डी एम पाटील यांनी दिले आहे. तत्पूर्वी चर्चा करताना गोरख ठाकूर, रूपेश भगत, राजू म्हात्रे, नंदू पाटील आदी खोपटे ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai