राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल दिवाळीपुर्वी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 30
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये ऐतिहासिक बंड करत अखंड शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदार फोडले. यानंतर शिंदे यांनी केंद्रिय निवडणुक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला. निवडणुक आयोगाने चिन्ह आणि नाव शिंदे यांना देण्याच्या निर्णयास ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या यचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून याच महिन्यात पूर्ण होणार असल्याचे वृत्त्त आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत 8 ऑक्टोबर झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदेसेनेचे वकील नीरज किशन कौल यांनी निवडणूक आयोगाची निरीक्षणे आणि पक्षांतर्गत लोकशाहीवर भाष्य केले. ते म्हणाले की, 1998 साली शिवसेनेला पत्राद्वारे कळवण्यात आले होते की पक्षातील नेमणुका या लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाहीत, ज्यावर शिवसेनेने आपले उत्तरही दिले होते. आयोगाने प्रत्येक पक्षाने आपली कार्यपद्धती ठरवून ती घटनेत नमूद करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच 2010 च्या नियमांनुसार, पक्षघटनेतील कोणताही बदल हा पक्षाच्या (पान 7 वर)
जनरल बॉडीकडून मान्य होणे बंधनकारक होते. पक्षात पडलेल्या फुटीबाबत आयोगाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा दाखला देत कौल म्हणाले की, शिवसेनेची कार्यपद्धती आणि नेमणुकांची पद्धत यातून पक्षांतर्गत लोकशाहीला धक्का बसत होता. तत्कालीन पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार देण्यात आले होते; पक्षप्रमुख आणि पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या होत्या, ज्यांना वेगळे करणे अशक्य होते. 2018 च्या पक्षघटनेनुसार सर्व पदाधिकारी नेमण्याचे अधिकारही थेट पक्षप्रमुखांनाच मिळत होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी आहे.
सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी एका सुनावणी दरम्यान पश्चिम बंगाल एसआयआरची सुनावणी त्वरीत घ्यावी अशी विनंती वकीलांतर्फं करण्यात आली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले की 30 ॲाक्टोबरपर्यंत शिवसेनेची सुनावणी संपवायची आहे. त्यानंतर बंगालमधील एसआयआरचे प्रकरण घेतले जाईल. त्यामुळे 30 ॲाक्टोबरपर्यंत म्हणजेच दिवाळीआधी शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळाणार, याबाबत समोर येणार आहे. निवडणूक आयोगाची बाजू पुढील आठवड्यात मांडली जाईल. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे रिजॉईंडर तिसऱ्या आठवड्यात होईल. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस निकाल अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai