सत्यजित पाटील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 29
उरण ः सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थ भावनेने समाजसेवेचा वसा जोपासणारे शिव प्रतिष्ठान करंजाडेचे संस्थापक अध्यक्ष सत्यजित पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र भूषण 2026’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील पत्रकार भवनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
सत्यजित पाटील हे पनवेल तालुक्यातील केळवणे गावचे सुपुत्र आहेत. 2017 पासून त्यांनी शिव प्रतिष्ठान करंजाडेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा ध्यास घेत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. केवळ सामाजिक उपक्रमांपुरते मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धन, पशुपक्ष्यांचे संगोपन आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. गड-किल्ल््यांचे पावित्र्य आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी स्वच्छता मोहिमा राबविणे, पर्यावरण संवर्धनासाठी ‘एक बिल्डिंग एक झाड’ हा अभिनव उपक्रम, मुक्या प्राण्यांसह चिमण्यांची तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याची भांडी उपलब्ध करून देणे, तसेच अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि पुस्तकांचे वाटप करणे, अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना आधार देत सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणाऱ्या सत्यजित दादा पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे शिव प्रतिष्ठान करंजाडेच्या सामाजिक कार्याचा गौरव झाला असून, समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांना यामुळे निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
सत्यजित पाटील यांना ‘महाराष्ट्र भूषण 2026’ पुरस्काराने गौरविण्यात आल्याने करंजाडे, केळवणे, पनवेल आणि उरण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai