रायगडमधील सरकारी शाळांची दुरवस्था
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 39
‘शाळा वाचवा’ अभियानातून शिक्षणाच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी!
उरण ः रायगड जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, बाके, वीज आणि शैक्षणिक साहित्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे ‘शाळा वाचवा’ अभियानांतर्गत केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन स्टुडंट्स मूव्हमेंटच्या वतीने खालापूर येथील आदिवासी भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश कदम यांनी भूषविले. यावेळी सविता सोनवणे कदम, राहुल माने, किरण केनी, विशाल पवार आणि संदीप जाधव उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन शिक्षक, विद्याथ आणि नागरिकांकडून माहिती घेतली. अनेक शाळांमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल शिक्षणाच्या घोषणा होत असताना विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागणे ही शिक्षणव्यवस्थेतील विषमता असल्याचे संघटनेने नमूद केले. पत्रकार परिषदेत शिक्षणाच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी करण्यात आली. शून्य वयापासून पदवीपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण, शिक्षणाचे खासगीकरण व बाजारीकरण बंद करणे, सर्वांना समान गुणवत्तेचे शिक्षण, वैद्यकीय व तांत्रिक शिक्षणाच्या समान संधी आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 15 टक्के निधीची शिक्षणासाठी तरतूद करावी, अशा मागण्या मांडण्यात आल्या.
तसेच स्थानिक आमदार, खासदार आणि प्रशासनाने सरकारी शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून पायाभूत सुविधांचा अभाव दूर करावा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
शिक्षण हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे, बाजारातील वस्तू नाही. सरकारी शाळांचे संरक्षण आणि शैक्षणिक समानतेसाठी पालक, विद्याथ, शिक्षक व नागरिकांनी ‘शाळा वाचवा’ अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन इंडियन स्टुडंट्स मूव्हमेंटच्या वतीने करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai