जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 32
बेलापूर जिल्हा सत्र न्यायालयातील घटना; सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई : पत्नीच्या हत्येचा प्रयत्न आणि सख्ख्या बहिणीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीने बेलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. नागेश बाबू लाड (34) असे मृत आरोपीचे नाव असून, सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे न्यायालयीन परिसरात खळबळ उडाली असून, न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश लाड याला पत्नी जोत्स्ना हिचे सख्ख्या बहिणीच्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून 2019 मध्ये त्याने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिच्या गळ्यावर वार केले होते. त्यानंतर तो बहिणीच्या घरी गेला आणि तेथे झालेल्या वादातून सख्खी बहीण सुनीता सिंग हिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात सुनीता यांचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी होऊन बचावली होती. घटनेनंतर फरार झालेल्या नागेशला नेरूळ पोलिसांनी तुर्भे नाका परिसरातून अटक केली होती.या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेलापूर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सोमवारी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब विचारात घेऊन नागेशला दोन्ही गुन्ह्यांत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेसाठी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने शौचालयात जाण्याचा बहाणा केला. मात्र, तेथून पाचव्या मजल्यावरील मोकळ्या जागेत पोहोचून त्याने खाली उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या नागेशचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
- सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीने पोलिसांच्या देखरेखीखाली असतानाही न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. न्यायालयातील शौचालयांच्या खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, निखळलेले दरवाजे आणि ग्रील नसलेल्या मोकळ्या जागांमुळे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. आरोपीला अशा मोकळ्या जागेपर्यंत पोहोचण्याची संधी कशी मिळाली, तसेच त्याच्यावर देखरेखीची जबाबदारी कोणाची होती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेची परिस्थिती आणि संभाव्य सुरक्षा त्रुटींचा तपास सुरू केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai