पारंपरिक पोशाख व्यवसायक्षेत्रात अंबानी, टाटा, बिर्लांमध्ये स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 20, 2021
- 1125
नवी दिल्ली ः देशात विवाह आणि तीन सणांसाठी परिधान केला जाणारा पारंपरिक (एथनिक) पोशाखांचा (लेहेंगा, शेरवानी, डिझायनर साड्या, कुर्ता इ.) व्यवसाय नेहमीच असंघटित आणि छोट्या डिझायनर, ब्रँड आणि उत्पादकांच्या हातात असतो. आता मात्र चित्र बदलू लागलं आहे. देशातली सर्वात मोठी उद्योगसंस्था असलेला टाटा समूह, आदित्य बिर्ला समूह आणि रिलायन्स रिटेल यांनी या बाजारात उडी घेतली आहे.
टाटा समूह आपल्या ‘वेस्टसाइड’ या चेनद्वारे एथनिक पोशाखांचा व्यापार करत आहे. टायटनच्या तानेरा श्रेणीद्वारे टाटा या विभागात आपली उपस्थिती मजबूत करत आहे. दरम्यान, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल आतापर्यंत व्हॅन ह्युसेन आणि पीटर इंग्लंड सारख्या ब्रँडद्वारे पाश्चिमात्य कपड्यांवर लक्ष केंद्रित करत होते. या कंपनीने सब्यसाची, तरुण ताहिलानी आणि शंतनू आणि निखीलसारख्या डिझायनर ब्रँडचे भाग खरेदी करून पारपंरिक पोशाख विभागातही प्रवेश केला आहे. रेमंडने स्वतंत्रपणे स्वतःची पारंपरिक श्रेणी सुरू केली आहे. रिलायन्स ग्रुपने आपल्या किरकोळ साखळी ‘ट्रेंड्स’द्वारे ‘अवंत्र बाय ट्रेंड’सुरू करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे अनन्य साड्या आणि एथनिक वेअर स्टोअर्सची रचना केली जाईल. पारंपरिक पोशाखाची बाजारपेठ एक लाख कोटी रुपयांची आहे. फॅशन रिटेल क्षेत्रात काम करणार्या ‘टेक्नोपाक’ या कंपनीचे वरिष्ठ भागीदार अमित गुगनानी यांच्या मते, भारतातला पारंपरिक पोशाख बाजार सुमारे एक लाख कोटी रुपयांचा आहे. यामध्ये 85 टक्के पेक्षा जास्त वाटा महिला विभागाचा आहे. एथनिक वेअर ब्रँड कल्की फॅशनचे संचालक निशित गुप्ता सांगतात की भारतात वर्षभर सण आणि लग्नांचा हंगाम असतो. यामुळेच टाटा-बिर्ला आणि अंबानींसारख्या मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यादेखील यात आपला हिस्सा अजमावत आहे. टाटांचे प्रवक्तेसांगतात की एथनिक पोशाख विभागात प्रवेश करण्याचं आमचं ध्येय दर्जेदार डिझायनर कपडे देणं हे आहे. आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये डिझायनर कुर्ता आणि ब्लाउजसारख्या वस्तूदेखील जोडत आहोत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai