बेकायदेशीर वाळू साठा हस्तगत
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 17, 2021
- 735
पनवेल: पनवेल तालुक्यातील कासारभाट ते डोलघर परिसरात अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळूचा साठा करण्यात येत असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना मिळताच विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात बेकायदेशीर वाळू साठा ताब्यात घेण्यात आला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा आणि साठा करून त्याची विक्री शासनाचे नियम मोडून छुप्या पद्धतीने होत असल्याचे अनेक तक्रारी पनवेल तहसील कार्यालयात येत असतात. तहसील कार्यालयाकडून वेळोवेळी अशीच कारवाई करण्यात येते. अशाच प्रकारे कासारभाट परिसरात अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळूचा साठा करण्यात येत असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळताच तलाठी, पोलीस पाटील आणि इतर पथकांनी तेथे जाऊन मोठ्या प्रमाणांत वाळू साठा जप्त केला आहे. त्यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे पनवेल तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai