पनवेलमध्ये काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2026
- 25
पाचशेहून अधिक बीएलए-2 प्रतिनिधींची नोंदणी; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी
पनवेल : ‘वोट बचाओ देश बचाओ’ अभियानाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पनवेलमध्ये संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत पाचशेहून अधिक बूथ लेव्हल एजंट (-2) प्रतिनिधींची नोंदणी करण्यात आल्याची माहिती पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत देण्यात आली. तसेच आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करण्याचे संकेत मावळ लोकसभा प्रभारी राणी अग्रवाल यांनी दिले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सोमवारी (16 नोव्हेंबर) काँग्रेस भवन, पनवेल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अखउउ प्रभारी तथा जोधपूरच्या माजी आमदार मनीषा पंवार आणि मावळ लोकसभा प्रभारी राणी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी डॉ. श्रुती म्हात्रे यांनी मागील तीन महिन्यांतील संघटनात्मक कामकाजाचा आढावा सादर केला. ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून पाचशेहून अधिक नवीन इङअ-2 प्रतिनिधींची नोंदणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेश काँग्रेसने दिलेले निर्देश आणि पक्षाचे विविध कार्यक्रमही पनवेलमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करताना राणी अग्रवाल यांनी काँग्रेस राज्यभर संघटनात्मक ताकद वाढवून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने बूथस्तरावर पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मनीषा पंवार यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून भाजपवर टीका केली. सत्तेत टिकून राहण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सजग राहून ‘वोट बचाओ देश बचाओ’ अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीत 15 ते 22 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ब्लॉकस्तरीय चौपाल बैठकांचे नियोजन, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत जनजागृती आणि आगामी संघटनात्मक कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. तसेच 25 व 26 नोव्हेंबर रोजी रायगड किल्ल्यावर आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला.
या बैठकीदरम्यान युवा नेते योगेश दिवटे, प्रवीण जॉन्स, जेकब थॉमस आणि शाहरुख शेख यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पनवेलमधील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख, मिलिंद पाडगावकर, डॉ. मनीष पाटील, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, नगरसेवक शशिकला सिंग, हेमराज म्हात्रे, संतोष पवार, महेश शिंदे, चेतन म्हात्रे, सुधीर मोरे, जोस जेम्स, अरुण कुंभार, डॉ. अमित दवे, सागर पगारे, सुरेश पाटील यांच्यासह प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते अजय कापरे यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai