85 आरोपीतांविरुध्द पुरावा गोळा करण्याचे काम सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 31, 2021
- 980
कर्नाळा बँक घोटाळा; गृहमंत्र्यांचे लक्षवेधीवर लेखी उत्तर
पनवेल ः कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील 85 आरोपीतांविरुध्द पुरावा गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सुचनेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे. आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी ठेवी परत मिळण्यासाठी काय कार्यवाही केली अशी लक्षवेधी सूचना मांडली होती.
पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व संचालकांनी हजारो कोटी रूपयाचा गैरव्यवहार केला असल्याचे उघडकीस झाले. सदर बँकेतील हजारो कोटी रूपयाच्या गैरव्यवहारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या संचालक व अधिकार्यांवर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही, त्यामुळे खातेदार व ठेवीदारांमध्ये शासनाच्या विरोधात चिड निर्माण झालेली, असून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या बँकेतल्या ठेवी तातडीने परत मिळण्यासाठी तसेच सदर गैरव्यवहारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणार्या संचालक व अधिकार्यांवर तातडीने कारवाई काय केली अशी लक्षवेधी सुचना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात दाखल केली होती.
या लक्षवेधीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, बँकेच्या कर्ज व्यवहाराचे विशेष लेखापरिक्षण करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना कळविले होते. यामध्ये गैरविनियोग व गैर व्यवहारामुळे सभासद, बँकेचे ठेवीदार व खातेदार यांच्या ठेवी धोक्यात आल्या असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अध्यक्ष व संचालक यांचेविरूध्द पनवेल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे ठेवीदार 50,689 असून त्यांचे केवायसी कागदपत्र प्राप्त करण्याचे त्यांची यादी बनविण्याचे काम सध्या बँक व्यवस्थापनाकडून सुरु आहे. फिर्यादीतील 76 व निष्पन्न 09 असे एकूण 85 आरोपीतांविरुध्द पुरावा गोळा करण्याचे काम सुरु आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, संचालक/पदाधिकारी यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता याची माहिती घेऊन महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत सदरची मालमत्ता गोठविण्याकरीता अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडून शासनास प्राप्त झाला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने त्याबाबतची पडताळणी करुन अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे असी माहिती गृहमंत्र्यांनी लक्षवेधी सीचनांवर दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai