मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 21, 2022
- 887
आंदोलनकर्त्यां कामगारांचा दृढ निश्चय
उरण ः विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी, कामगारांच्या हिताचे असलेले सोयी सुविधा देण्यास टाळाटाळ करत असल्याबद्दल तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास ओएनजीसी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने 15 फेब्रुवारी 2022 पासून कामगारांनी उपोषण सुरु केले आहे. एमओयु एम्प्लाईजचे सर्वेसर्वा, डायरेक्ट एम्प्लॉईजचे नेते, प्रमुख मार्गदर्शक शालीग्राम मिश्रा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन काही मागण्या मान्य केल्या. कामगारांनी एक पाऊल मागे येत पनवेल येथील उपोषण समाप्त केले. परंतु आधीचा अनुभव लक्षात घेता जो पर्यंत कामगारांना लिखित स्वरूपात ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निश्चय करुन उरण येथील कामगारांनी उपोषण सुरुच ठेवले आहे.
गेल्या 24 वर्षांपासून कामगार सोयी सुविधांपासून वंचित आहेत. मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी 15 फेब्रुवारी 2022 पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. ओएनजीसी प्रशासनानाने कामगारांनी केलेल्या साखळी उपोषणाची दखल घेऊन एमओयु एम्प्लाईजचे सर्वेसर्वा, डायरेक्ट एम्प्लॉईजचे नेते, प्रमुख मार्गदर्शक शालीग्राम मिश्रा यांना चर्चेला बोलविले. शालीग्राम मिश्रा यांनी 19 फेब्रुवारी उरण तालुक्यातील ओएनजीसी एपीयु गेट येथे चालू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली. सर्व कामगारांना पुढील वाटचालीची रुपरेखा आणि मार्गदर्शन त्यांनी केले. सर्व सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शंका निरसन करून घेतली. पनवेलमध्ये कामगार प्रतिनिधी सोबत चर्चा करून मिश्रा यांनी काही मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. परंतु या आधीच्या ओएनजीसी मॅनेजमेंटच्या फसवणुकीचा अनुभव घेतलेल्या कामगारांनी जो पर्यंत कामगारांना लिखित स्वरूपात ठोस निर्णय आणि सानूग्रह अनुदान मिळणार नाही तोपर्यंत उरण प्लांट समोरचे साखळी आंदोलन चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. कामगार सुज्ञ आणि सकारात्मक असल्याने त्यांनी पनवेल ओएनजीसी कंपनी समोरचे आंदोलन समाप्त करून एक पाऊल मागे घेऊन मॅनेजमेंटच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती ऑईल फिल्ड एम्प्लाईज असोसिएशन कामगार प्रतिनिधी निरंजन लवेकर आणि सुनिल नाईक यांनी दिली आहे. परंत, उरण मधील ओएनजीसी कंपनी समोर कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी कामगारांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai