मालमत्ता कराविरोधात लाँग मार्च
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 12, 2022
- 722
नवी मुंबई ः शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेच्या जुलमी मालमत्ता करविरोधात नवी मुंबई 95 गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीने हिरानंदानी खारघर ते पनवेल महानगरपालिका मुख्यालय पर्यंत लाँग मार्च काढला होता. यामध्ये पनवेल-उरण महाविकास आघाडीचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी नो सर्व्हिस नो टॅक्सचा नारा देण्यात आला.
पनवेल महापालिकेने लावलेल्या जाचक कराला पनवेल शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी विरोध केला असून पालिकेचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई 95 गाव नैना प्रकल्पग्रस्त समिती, इतर प्रकल्पग्रस्त समिती व महाविकास आघाडीच्यावतीने खारघर ते पालिका मुख्यालयापर्यंत लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेने न दिलेल्या सुविधेचा कर वसूल करण्याचा भुर्दंड नागरिकांवर लादल्याने याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. हा कर रद्द करावा यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु पालिकेकडून कोणताच तोडगा न काढता कर भरण्याची सक्ती केली जात आहे. कर न भरण्याची ठाम भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. जो पर्यंत मालमत्ता कर माफ केला जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार असून कर भरणार नसल्याचे अॅड सुरेश ठाकुर यांनी सांगितले. या पुढील काळात जर पालिकेने यावर तोडगा काढला नाही तर भविष्यात महानगरपालिकेला घेराव घालून टाळे टोकण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
नवी मुंबई 95 गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या शिष्टमंडळासह पालिका मुख्यालयात आयुक्त गणेश देशमुख साहेबांसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील साहेब, पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, पनवेल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे सभापती काशिनाथ पाटील, नवी मुंबई 95 गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे इतर मान्यवर, महिला मंडळ व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai