पनवेल महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 13, 2022
- 742
पनवेल ः पनवेल महापालिकेचा कार्यकाळ 8 जुलै रोजी संपुष्टात आल्याने पालिकेवर प्रशासकाची नेमणुक करण्यात आली आहे. पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. यापुढे सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे सर्वाधिकार प्रशासक म्हणून देशमुख यांना येणार आहेत.
1 ऑक्टोबर 2016 ला स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 2 मे 2017 ला पार पडली. निवडणुकीतून नवनिर्वाचित नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 8 जुलैला संपला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत तीन ते चार महिने महापालिकेतील विकास कामे प्रशासकांच्या माध्यमातून चालणार आहेत. त्यामुळे प्रशासक म्हणून काम करण्यास गणेश देशमुख यांना अधिक वाव मिळणार आहे. पाच ते 25 लाखांपर्यंतचे आणि त्यापेक्षा अधिक रक्कम असणार्या प्रस्तावांना प्रशासक मंजुरी देऊ शकतात. प्रशासकाच्या राजवटीमुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधींचे अधिकार संपले आहेत. प्रशासनातर्फे लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली वाहने आणि कार्यालये परत करावी लागणार आहेत. तसेच या पुढे लोकप्रतिनिधींना त्यांच्या लेटरहेडवर माजी नगरसेवक या नावाने पत्रव्यवहार करावा लागणार आहे.
कोविडमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबतच पावसाळा संपल्यानंतर पहिल्या महिन्यातच पनवेल महापालिकेची निवडणूक होणार आहेत. एमएमआर क्षेत्रात कोविडमुळे रखडलेल्या नवी मुंबई, ठाणे, मुंबई, भिवंडी, वसई-विरार या महापालिकांसोबत आता पनवेल महापालिकेचीही निवडणूक एकत्रितरीत्या होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai