रुग्णालयीन सुविधा देताना वेळचे नियोजन करा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 20, 2022
- 775
- औषध वितरण खिडक्यांमध्ये वाढ करण्याच्या आयुक्तांच्या सूचना
नवी मुंबई ः पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नोंदणी, तपासणी, आवश्यकतेनुसार एक्सरे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन अशा चाचण्या करणे तसेच औषधे घेणे या प्रक्रियेसाठी कमीत कमी प्रतिक्षा कालावधी असावा व नागरिकांचा वेळ वाचावा यादृष्टीने आवश्यक बदल करावेत असे निर्देश पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाशी रुग्णालय भेटीप्रसंगी दिले. तसेच आवश्यकतेनुसार औषध वितरण खिडक्यांमध्ये वाढ करण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
आयुक्तांनी बुधवारी सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे अचानक भेट देत केस पेपर नोंदणी कक्षांसह इतर सर्व सुविधांची बारकाईने पाहणी केली. केस पेपर नोंदणी करताना ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच दिव्यांग व गरोदर महिला यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणेबाबत नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी याप्रसंगी दिल्या. रुग्णालयात खाजगी संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या दरात सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध केली जात होती. नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध करून घेण्यात आलेली आहे. या नव्याने सुरू व्यवस्थेची आयुक्तांनी पाहणी केली. पालिकेच्या सुविधेत सीटी स्कॅन कॉन्ट्रॅस्ट लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने साधनसामुग्री घेऊन नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. अशाच प्रकारे एक्सरे कक्ष, सोनोग्राफी कक्ष, ईसीजी कक्ष अशा सर्व चाचण्यांच्या कक्षांना भेटी देऊन प्रतिदिन किती चाचण्या होतात याचा आढावा घेताना नागरिकांना चाचण्यांसाठी किती वेळ वाट पहावी लागते याचाही तपशील प्रत्येक चाचणी कक्षात आयुक्तांनी जाणून घेतला. सोनोग्राफी कक्षाबाहेर गरोदर महिलांना जास्त वेळ प्रतिक्षा करावी लागणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे औषध वितरण कक्षाला भेट देत आयुक्तांनी औषध वितरण प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली. औषधे घेण्यासाठी नागरिकांना फार वेळ रांग लावावी लागू नये यादृष्टीने दैनंदिन आढावा घेऊन आवश्यकतेनुसार औषध वितरण खिडक्यांमध्ये वाढ करण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी रुग्णालय मध्यवर्ती व सर्वांना सोयीचे असल्याने या रुग्णालयावर रुग्णसेवेचा सर्वाधिक भार असतो. त्यामुळे येथील कार्यप्रणालीचे सुव्यवस्थित नियोजन करून रुग्णांचा कमीत कमी वेळ सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेत जावा या नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयाकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बारकाईने लक्ष दिले. पालिकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार्या विविध चाचण्यांच्या सुविधाही अधिक गुणवत्तापूर्ण रितीने व सुलभ रितीने दिल्या जाव्यात याबाबतही रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे यांना निर्देश दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai