गणेश मंडळांसोबत प्रशासनाची समन्वय बैठक
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 12, 2022
- 711
परवानग्या, रस्त्यांवरील खड्ड्यांसह विसर्जन घाटांच्या व्यवस्थेवर चर्चा
पनवेल ः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी गणेश मंडळांकडून सुरु आहे. या उत्सवादरम्यान पालिका, सिडको प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असते. या सर्व प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत फडके नाट्यगृहात आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत मोठ्या संख्येने पालिका क्षेत्रातील गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी पीपीटीद्वारे गणेशोत्सवाची नियमावलीची माहिती मंडळाच्या प्रतिनिधींना दिली. यानंतर मंडळांना भेडसावणार्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मंडळाच्या प्रतिनिधीनींना उत्सवाकरिता लागणार्या ऑनलाईन परवानग्या, पोलिसांची परवानगी, ध्वनिक्षेपण आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पालिका प्रशासनाच्या मंडळांना सहकार्याची अपेक्षा मंडळांनी यांनी व्यक्त केली. याव्यतिरिक्त पालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे का? याबाबतदेखील कांतीलाल कडू यांनी आयुक्तांकडे प्रश्न उपस्थित केला. मात्र, मंडळांचे कार्यक्रम ठिकाण सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित नसेल तर तशी आवश्यकता नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले.
पनवेल शहरात सणासुदीला वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. ही सोडविण्यासाठी पालिकेमार्फत ट्रॅफिक वार्डंन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला आयुक्त देशमुख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, विठ्ठल डाके, डॉ. वैभव विधाते आदींसह सर्व प्रभाग अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते. एकीकडे गणेशाचे आगमन होत असताना मिरवणुकीत रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. खड्ड्यांमुळे ही कोंडी होत असल्याने खड्ड्यांचा विषय कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी उपस्थित केला. आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत पालिकेने नेमलेल्या एजन्सीने तशा सूचना देण्यात येतील, असे यावेळी स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai