दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 02, 2022
- 751
नवीन पनवेल ः दुचाकी वाहनासाठी एमएच 46 सीजी ही नवीन मालिका पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच सुरू होणार आहे. या सुविधेचा उरण, पनवेल, कर्जत, खालापूर येथील वाहनधारकांना लाभ घेता येणार असल्याने इच्छुकांना संपर्क करण्याचे आवाहन पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरून नावे आकर्षित करू शकता. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक जर इतर वाहनांना हवा असल्यास निर्धारित रकमेच्या तिप्पट पैसे भरून तो नंबर ग्राहक आपल्या नवे आरक्षित करू शकतो, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे. तसेच या मालिकेतील आकर्षक एक या क्रमांकांसाठी इच्छुकांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. पसंतीचा क्रमांक रक्षण करण्यासाठी प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून मोटर वाहन नियम 1989 च्या नियम 57 ‘अ’ अन्वये आकर्षक, अनाकर्षक नोंदणी क्रमांक करायचे असतील, त्यांनी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ लिपिक राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai