बौद्धिक दिव्यांग मुलांच्या पालकांचे संमेलन उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 20, 2022
- 596
नवी मुंबई ः वाशीतील ईटीसी केंद्रात नुकतेच बौद्धिक दिव्यांग मुलांच्या पालकांचे क्षेत्रीय संमेलन उत्साहात पार पडले. परिवार एनसीपीओ, संमलेनाचे प्रायोजक राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई संस्था, भारत सरकार आणि संमलेनासाठी सहयोग इ.टी.सी. केंद्र वाशी यांच्या सयुंक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. या संमलेनामध्ये 290 हुन अधिक पालक सहभागी झाले होते.
या पालक संमलेनासाठी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या विविध राज्यातून पालक आले होते. या प्रादेशिक पालक संमलेनाची थीम होती ‘समान उपजीविकेच्या संधी’ आणि ‘सन्मानाने जगणे’. या संमेलनाच्या उद्धघाटनच्या वेळी इ. टी. सी. केंद्राच्या संचालिका डॉ वर्षा भगत या उपस्थित होत्या. थीमशी संबंधित पहिल्या दिवशी विविध विषय तज्ज्ञांनी आपआपले मत मांडले. यामध्ये श्रीरंग बिजूर, अध्यक्ष, परिवार एन सी पीओ यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी शाश्वत रोजगार/आजीविका या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह यांनी दिव्यांगता जागरूकता आधारित ऍनिमेटेड फिल्म्सचे अनावरण केले. सुश्री क्लेलिया पावलॉस व्याख्याता मनोविज्ञान रा.बौ.दि.स.सं,क्षे.कें.न मुं यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी त्यांच्या पालकांचे आणि कुटुंबांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण, पी. एस. बुरडे, अध्यक्ष, परिवार एन सी पो ओ सह्याद्री यांनी उपजीविकेसाठी स्व वकालात आणि प्रासंगिकता, सुरेश पाटील, सचिव संवेदना लातूर यांनी कायदा 2016, व्यंकट लामजणे, राज्य समन्वयक, यांनी महाराष्ट्र व भारत सरकारच्या योजना, विश्वास गोरे व्यवस्थापक आधार निवासी शाळा या विविध विषयावर सर्व पालक व व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. दुसर्या दिवशी डॉ शीतल समन्वयक यांनी शीघ्र हस्तक्षेपाचे महत्व, सुश्री अनुषा संपत व्याख्याता भौतिकोपचार, रा.बौ.दि.स.सं,क्षे.कें.नमुं यांनी बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी घरगुती उपचारात्मक व्यवस्थापन, नितीन शहा, अशोक चव्हाण व राजेंद्र जोशी यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य यावर चर्चा केली. श्रीरंग बिजूर, अध्यक्ष, परिवार एन सी पी ओ यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीला सक्षम करण्यात पालकांची भूमिका, डॉ. रवी प्रकाश सिंह प्रभारी अधिकारी रा.बौ.दि.स.सं,क्षे.कें.नमुं यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बौद्धिक दिव्यांग मुलांचे शिक्षण, डॉ रमेश बावसकर, प्रभारी अधिकारी, क्षेत्रीय संशोधन संस्था होमिओपॅथी नवी मुंबई यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी होमिओपॅथी उपचार, सुश्री अदिती वर्मा आणि प्रणय बुरडे यांनी माझी निवड या विविध विषयावर पालकाना मार्गदर्शन केले. संमेलनामध्ये एका समस्येवर पालक संघटना आणि एनजीओची नोंदणीसाठी होणार्या दिरंगाईबद्दल काही पालकांनी अधिकार्याविरोधात संताप व्यक्त केला. तसेच नोंदणीसाठी पोर्टल सदोष असून त्यात सुधारणा करण्याची मागणी केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai