द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स कला प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- May 05, 2023
- 506
उरण ः जहांगिर आर्ट गॅलरी येथे द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स या समूह प्रदर्शनाचे आयोजन 2 ते 8 मे दरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये सुप्रसिध्द कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. कलेची विविधांगी रूपे येथे पाहता येणार आहेत.
द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स हे प्रदर्शन रसिकांना सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येतील. या प्रदर्शनामध्ये सुप्रसिध्द कलाकार लक्ष्मीनारायण शर्मा, ममता शर्मा, रुपेश पाटील, कुमार गायकवाड, राजू औताडे, कल्पना आर्य, चेतन वैती, वैभव गायकवाड, मकरंद जोशी, श्रेयस खानविलकर या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. लक्ष्मीनारायण शर्मा हे वास्तववादी शैलीत चित्र साकारतात. ममता शर्मा यांच्या चित्रातून मानवी आकृत्यांचे अलंकारात्मक मोहक चित्रण रसिकांना पाहता येते. रुपेश पाटील हे वास्तवादी शैलीत काम करतात आणि पेस्टल व जलरंगांवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. कुमार गायकवाड हे भारतीय संस्कृतीला आपल्या विशिष्ट शैलीच्या माध्यमातून कॅनव्हासवर चितारतात. राजू औताडे हे प्रामुख्याने ॲक्रिलिक माध्यमात काम करतात. कल्पना आर्य यांच्या सिटीस्केप्स रसिकांना शहरांच्या सौन्दर्याशी नव्याने परिचय करून देतात. चेतन वैती हे कलात्मक पद्धतीने शिल्प तयार करतात. वैभव गायकवाड हे आपल्या कलाकृतीमध्ये वैविध्यपूर्ण माध्यमांचा वापर करतात. मकरंद जोशी यांची जलरंगांमधील निसर्गचित्रे प्रमाणबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. श्रेयस खानविलकर हे वास्तुविशारद असून शिल्पकारही आहेत. त्यांच्या कलाकृती भविष्याचा वेध घेणाऱ्या ठरतात. मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी संदिप शुक्ला, बॉम्बे आर्ट सोसायटीचे प्रेसिडेंट राजेंद्र पाटील, अभिनेत्री सुकन्या मोने, डायरेक्टर अंकुर काकटकर, अभिनेता अमीर तळवलकर,सुचित्रा गोसावी, गायक देवेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते रमेश पेडणेकर, आदी मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai