‘गेट वेल सून उद्धव ठाकरे' म्हणत वाशीत आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 13, 2023
- 277
नवी मुंबई : नागपूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्याचा निषेध नवी मुंबईत करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या फोटोला फुले पुष्गुच्छ वाहण्यात आली आणि तुम्ही आजारातून लवकर बरे व्हा, अशा अशा शुभेच्छा देण्यात आल्या. सदर आंदोलन माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा नागपूर येथे मेळावा पार पडला. यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हणून टिका करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याचे पडसाद नवी मुंबईत उमटले असून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. “आजारी आहात लवकर बरे व्हा गेट वेल सून” म्हणत हे आंदोलन केले . यावेळी उद्धव ठाकरे यांच्या फोटोला सर्वांनी फुले, पुष्पगुच्छ वाहिली. उद्धव ठाकरे हे सध्या कावीळ झाल्या प्रमाणे वागत असून त्यांच्या डोळ्यावर असलेल्या चष्म्यातून त्यांना सत्य दिसत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असल्या प्रमाणे त्यांनी वागावे, ही अपेक्षा आम्हाला आहे. मूळ विचारधारा सोडल्याने त्यांना हे दिवस पाहावे लागत आहेत. अशी टिका नरेंद्र पाटील यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा फोटो जोडे मारण्यासाठी किंवा जाळण्यासाठी नाही तर फुले वाहण्यासाठी आम्ही आणला असून त्यांनी लवकर आजारातून बरे व्हावे हिच इच्छा आहे. अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai