जलतरण तलावाचे खासगीकरण रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 29
नवी मुंबई : घणसोली येथील सेंट्रल पार्कमधील जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा घाट घालून पालिकेने निविदा प्रक्रिय राबवली होती. मात्र याला विरोध करत प्रस्तावित खासगीकरण रद्द करुन तो सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिकेमार्फत सुरु करण्याची मागणी मनसेने केली होती. त्याची दखल घेऊन पालिकेने सदर निविदा रद्द करुन सदर जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करणार असल्याचे सांगितले.
सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव पुर्णत्वास आल्यानंतर नागरिकांसाठी खुला करण्यासाठी प्रशानाला अनेक महिने लागले होते. त्यानंतर आता त्याचे खासगीकरणाचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र याला अनेकांचा विरोध झाला. मनसेने सदर खासगीकरण रद्द करुन तो नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी केली होती. त्या संदर्भातले निवेदन मनसेच्या वतीने क्रीडा विभागाच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मनसेच्या या निवेदनाची दखल घेत नवी मुंबई महापालिका क्रीडा समितीचे सभापती तसेच क्रीडा विभाग उपायुवत यांनी घणसोली सेंट्रल पार्क येथील जलतरण तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मनसेचे संदिप गलुगडे यांच्यासोबत इतर पदाधिकारी तसेच घणसोलीतील नागरिक उपस्थित होते.
यावेळी मनसेच्या वतीने संदिप गलुगडे यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा या मूलभूत सुविधा या नागरिकांना सेवा म्हणून उपलब्ध करुन देणे महापालिकेची जबाबदारी आहे, असे परखडपणे सांगितले. या सुविधांकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून पाहण्याची महापालिकेने मानसिकता बदलली पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि भविष्यातील खेळाडुंच्या जडण-घडणीशी संबंधित सुविधांंमध्ये नफा-तोट्याचा विचार न करता जनसेवेला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मनसेच्या शिष्टमंडळाच्या मागणीवर उत्तर देताना क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे यांनी सद्यस्थितीत सुरु असलेली निविदा प्रक्रिया नागरिकांच्या मागणीचा विचार करुन रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच सेंट्रल पार्कचा जलतरण तलाव लवकरात लवकर पुन्हा नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मनसेच्या या भूमिकेमुळे घणसोलीकरांच्या प्रश्नाला सकारात्मक दिशा मिळाल्याचे संदिप गलुगडे यांनी यावेळी सांगितले. याप्रंगी मनसेचे घणसोली विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण, उपविभाग अध्यक्ष अक्षय नाईक, हरिश चव्हाण, शाखा अध्यक्ष निलेश जाधव, चंद्रशेखर करंडे, हर्षद गाडगीळ आणि घणसोलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai