नैना क्षेत्रात युडीसीपीआरसाठी अधिसूचना
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2021
- 447
सिडकोने मागविल्या जनतेच्या सूचना व हरकती
नवी मुंबई ः सिडको महामंळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पाच्या जलद विकासासाठी तसेच नजीकच्या काळात उदयास येणार्या नैना प्रदेशात व्यवसाय सुलभतेसाठी राज्य शासनाच्या एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील (युडीसीपीआर) काही मार्गदर्शक तरतूदींचा अंगीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सिडकोने सर्वसाधारण जनतेच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी सूचनाही प्रसिद्ध केली आहे.
सिडकोकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा भोवतालच्या प्रदेशात होणारी संभाव्य अनिर्बंध वाढ रोखण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील 371 चौ.कि.मी. च्या प्रदेशावर नैना प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. सिडकोकडून शहरांतर्गत वैद्यकीय सिटी, क्रीडा सिटी, शैक्षणिक सिटी, संशोधन व विकास क्षेत्र, पर्यावरणीय पर्यटन, मनोरंजन सिटी अशी समर्पित क्षेत्रे विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे हे शहर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. संधानतेचा (कनेक्टिव्हिटी) विचार करता महामार्ग, उपनगरी रेल्वे, मेट्रो यांद्वारे नैना शहराला उत्तम संधानता लाभणार आहे. या सर्वांमुळे नैना प्रदेशात उद्योग, व्यवसाय आणि वाणिज्यिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नैना प्रदेशातील भावी उद्योजकांना व्यवसाय सुलभतेचा लाभ व्हावा यासाठी युडीसीपीआरमधील विशिष्ट तरतुदींचा नैना प्रकल्पामध्ये समावेश करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे नैना प्रकल्पासह एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील सर्वोत्कृष्ट तरतूदींची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे व या माध्यमातून अधिक व्यवहार्य प्रकल्प मार्गी लागतील व सर्वांगीण विकासास मदत होईल. याकरिता 3 नोव्हेंबर 2021 रोजी शासनाच्या अधिकृत राजपत्रात महाराष्ट्र प्रादेशिक प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमच्या कलम 37, उपकलम (1) अन्वये सर्वसाधारण जनतेच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचनेवर सर्वसाधारण जनतेच्या सूचना आणि हरकतींवर सुनावणीसाठी मुख्य नियोजनकार (नैना), एसपी (डीपी नैना) आणि एसपी (बीपी नैना) यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
नैना हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असणार असून या शहरात व्यावसायिक आणि वाणिज्यिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर उदयास येणार आहेत. सिडको महामंडळ नैना क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे. युडीसीपीआरमधील काही विशिष्ट तरतुदींचा नैना प्रकल्पामध्ये समावेश करण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे व यामुळे व्यवसाय सुलभता प्रदान होईल.
- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai