1014 हेक्टर कांदळवन हस्तांतरणास मंजुरी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 21, 2022
- 486
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी त्यांच्या ताब्यातील 1014 हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन राज्याच्या वन विभागाकडे सुपूर्द करणार असल्याचे मान्य केले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात ट्वीट द्वारे माहिती दिली. सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत जेएनपीटीने आपली 815 हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन वन विभागाला देण्याचे मान्य केले आहे. तर, एमएमआरडीए 199 हेक्टर जमीन सुपूर्द करणार आहे. या पूर्वी 11 जानेवारी 2022 रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जेएनपीटी’, ‘सिडको’, वन विभाग आणि कोकण विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली होती. या बैठकीत ठाकरे यांनी ‘जेएनपीटी’ला त्यांच्या ताब्यातील कांदळवन आच्छादित जमिनींचे घोषणा करण्याबाबत तीन महिन्यांचे अल्टिमेटम दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर, 2018 रोजी कांदळवन आच्छादित सरकारी जमिनींवरील वाढते अतिक्रमण लक्षात घेता एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. या निर्णयानुसार कांदळवन आच्छादित सर्व सरकारी जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. यापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या कांदळवन संरक्षण आणि संवर्धन समितीने ’जेएनपीटी’ ला कांदळवन नष्ट केल्याबद्दल दंड ठोठावला होता. गेल्या दोन वर्षांत 11 हजार हेक्टरहून अधिक जागा वन विभागाला हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याच बरोबर ‘सिडको’च्या ताब्यात असलेले अंदाजे 1,800 हेक्टर कांदळवन आच्छादित क्षेत्र हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत आहे.
- पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्वीटनुसार जेएनपीए 815 हेक्टर कांदळवन वन विभागाला वर्ग करणार आहे. मात्र माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार जेएनपीएकडे 913 हेक्टर कांदळवन होते. मग शंभर हेक्टर कांदळवनाचे कुठे आहे असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला असून 2018 नंतर मोठी क्षेत्र बुजवण्यात आल्याचा आरोपही केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai