पालिकेच्या भूखंडांवर डल्ला
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2022
- 554
आ.नाईक यांचा आरोप; एमआयडीसीच्या चौकशीची मागणी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतर केलेले सुविधा भूखंड एमआयडीसी आणि सिडको प्रशासन विकत असल्याचा आरोप ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. यामुळे भविष्यात नवी मुंबईकरांना नागरी सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येणार असून या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला विविध नागरी सुविधा प्राप्त करून देण्यासाठी एमआयडीसी आणि सिडको प्राधिकरणाकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अधिकच्या सुविधा भूखंडाची मागणी केली आहे. यापैकी काही भूखंड हस्तांतरित झाले आहेत, तर काही भूखंड हस्तांतरणाच्या प्रक्रियेत आहेत. मात्र पालिकेने मागणी केलेल्या सुविधा भूखंडांची या दोन्ही प्राधिकरणांकडून सर्रासपणे विक्री केली जात असल्याचा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. तसेच या सुविधा भूखंडांच्या विक्रीमुळे भविष्यात नवी मुंबईकरांना पार्किंग, वाचनालय, विरंगुळा केंद्र, शाळा, स्मशानभूमी, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ट्री बेल्ट, मलनिस्सारण केंद्र, मैदाने इत्यादी नागरी सेवा सुविधांसाठी भूखंड उपलब्ध होणार नसल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या मालकीचे सुविधा भूखंड विकण्याचा सपाटा एमआयडीसी आणि सिडको या दोन प्राधिकरणांनी लावला असून ही विक्री तात्काळ थांबवावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 29 जुलै रोजी पत्रान्वये केली आहे.
यात पावणे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक ओ.एस. 16 उ ( भूखंड क्रमांक सी 11/12) हा नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचा भूखंड आहे. दिघा येथील मुकुंद पोलिस चौकीसमोरील कृष्णा बिझनेस पार्क शेजारचा भूखंडाचा समावेश असून या ठिकाणी सिव्हरेज लाईन आणि सिव्हरेज केंद्राचे काम सुरू आहे. एमआयडीसीने या भूखंडाची विक्री परस्पर दुसर्या व्यक्तीला केल्याने येथील सिव्हरेज केंद्राचे काम थांबले आहे. रबाळे तलावाजवळील आर 591/592 हे भूखंड एमआयडीसीने नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai