प्राणीप्रेमी राजू मुंबईकरांनी वाचविले मोराचे प्राण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 12, 2023
- 520
उरण ः तालुक्यातील रानसई आदिवासीवाडी येथे काही कामानिमित्त जात असताना जंगलातील रस्त्याच्या बाजूला झाडाचा आधार घेत शांत बसलेला मोठा मोर निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी म्हणून परिचित असलेल्या राजू मुंबईकर यांना दिसला. ते मोराच्या जवळ गेले असता त्याला उडता येत नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कर्नाळा आर एफ ओ राठोड यांना याबाबत कल्पना दिली असता त्यांनी लगेच फॉरेस्टर वारगे यांना पाठवले. मोरावर उपचार करुन त्याची रवानगी कर्णाळा पक्षी अभयारण्यात करण्यात आली आहे. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्रचे सचिव विलास ठाकूर, आर एफ ओ राठोड, फॉरेस्टर वारजे यांच्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने मोराचे प्राण वाचले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai