Breaking News
उरण ः लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पनवेल व अविनाश म्हात्रे (पाले) व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 ते 3.30 वा. या वेळेत रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन, (कृ.द. जोशी सभागृह) येथे भव्य दिव्य असे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उमेदवारांनी आपली नावनोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून किंवा गूगल वर सर्च केल्यानंतर येणाऱ्या नावनोंदणी अर्जाला पूर्णपणे भरून स्वतःची नाव नोंदणी करावी.
हीींंीि://लळीं.श्रू/ळीिज्ञेपक्षेलषरळीमीशसळीीींरींळेप या लिंक द्वारे नाव नोंदणी करावी.या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवाऱ्याच्या नोंदणी व प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत, या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी कृ.द. जोशी सभागृह येथे उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai