जुन्या निरुपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी निविदा
- by Aajchi Navi Mumbai
- May 15, 2026
- 22
नवी मुंबई :विभागीय माहिती कार्यालयातील मासिके, मराठी, हिंदी, इंग्रजी जुन्या वर्तमानपत्राची रद्दी तसेच या कार्यालयातील उपयोगात नसलेल्या जुन्या निरुपयोगी वस्तू जशा आहेत तशा स्थितीत उदा.नादुरुस्त-संगणक, प्रिटर,लोखंडी कपाटे, खुर्च्या, विद्युत बॅटरी, जुने टायर, रद्दी इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरी ज्या व्यक्तींना संस्थांना या वस्तू खरेदी करावयाच्या आहेत, त्या इच्छुक व्यक्तींकडून मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.
ही वर्तमानपत्राची रद्दी तसेच जुन्या निरुपयोगी वस्तू /सामान दि. 15 मे ते 22 मे, 2026 या कालावधीत खालील पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शनिवार-रविवार व इतर सार्वजनिक शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायंकाळी. 04.00 या वेळेत प्रत्यक्ष पाहता येतील. इच्छुक रद्दी, जुने निरुपयोगी सामान खरेदीदारांनी निविदाधारकाने आपल्या निविदा मोहोरबंद लखोट्यात भरुन त्यावर निर्लेखित वस्तू निविदा तसेच जुनी रद्दी दरपत्रके असा स्पष्ट उल्लेख करुन वेगवेगळ्या दोन लिफाफ्यात व तसे लिफाफ्यावर लिहून उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, 3 रा मजला, कक्ष क्र. 317 कोंकण भवन, नवी मुंबई 400 614 यांच्याकडे दि. 22 मे, 2026 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये जमा करावे, दि. 22 मे, 2026 नंतर आलेल्या निविदा स्विकारल्या जाणार नाहीत, असे आवाहन कोकण विभागाचे प्र. उपसंचालक (माहिती) यांनी केले आहे.
प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणास्तव वरील निविदा सादर करावयाच्या किंवा उघडण्याच्या वेळापत्रकात बदल होवू शकतो तसेच देकार निविदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार समिती अध्यक्ष विक्रीसाठी तथा उपसंचालक (माहिती) कोंकण विभाग, कोंकण भवन, नवी मुंबई यांनी राखून ठेवले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai