नवी मुंबईच्या कराटेपटूंची दमदार कामगिरी
- by Aajchi Navi Mumbai
- May 26, 2026
- 32
बी मोअर फिट जिम मध्ये खेळाडूंचा भव्य सत्कार
नवी मुंबई : कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कॅडेट, ज्युनियर व सब-ज्युनियर राज्य निवड कराटे स्पर्धा’ दि. 9 व 10 मे 2026 रोजी आडगाव, नाशिक येथील डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या प्रतिष्ठित स्पर्धेत एन.पी.ओ जापान कराटे दो केइबुकाई इंडिया फेडरेशन आणि स्पोर्ट्स कराटे दो असोसिएशन ऑफ नवी मुंबई, कुकशेत येथील जय गजानन मित्र मंडळ संचलित बी मोर फिट जिम च्या कराटेपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत नवी मुंबईच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 कराटेपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 1 सुवर्ण व 3 कांस्य पदकांसह एकूण 4 पदके पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे संबंधित खेळाडूंनी पुढील महिन्यात देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशस्वी कराटेपटूंचा विशेष सत्कार समारंभ ‘जय गजानन मित्र मंडळाचे’ अध्यक्ष दीपक पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. जिमचे संचालक सागर गवाणकर यांनी सर्व खेळाडूंचा गौरव करत त्यांच्या मेहनतीचे आणि यशाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती तसेच प्रभाग क्रमांक 24 चे नगरसेवक गिरीश म्हात्रे उपस्थित होते. त्यांनी सर्व कराटेपटूंना शुभेच्छा देत भविष्यात नवी मुंबईतील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर चमकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य व प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले.
या सर्व यशामागे सेन्सेई सुवर्णा तळेकर, सेन्सेई आर्यन तळेकर, सेन्सेई संकेत जेधे तसेच जे. के.के.आय. चे प्रमुख व स्पोर्ट्स कराटे दो असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष शिहान शिरीष किसन तळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपस्थित पालकवर्गानेही खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
विशेष यश संपादन करणारे खेळाडू
मास्टर आर्यन धर्मेंद्र सिंह- अंडर-19 कुमिते प्रकारात स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया - राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेता
मिस अन्वी संतोष पाटील- कुमिते सुवर्णपदक विजेती - ( राष्ट्रीय पातळीवर निवड देहरादूनसाठी निवड)
राज्यस्तरीय विजेते
- मिस परीनी सोनाली श्याम कोळी- कुमिते कांस्यपदक विजेती
- मास्टर पार्थ राजेंद्र यादव- काता कांस्यपदक विजेता
- मास्टर आदित्य अजित कावळे- कुमिते कांस्यपदक विजेता
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai