वाशीत 30 जूनला ‘डाक अदालत’
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 23
नवी मुंबई : विविध टपाल सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारी दीर्घकाळ प्रलंबित राहतात. अशा रखडलेल्या प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी भारतीय टपाल विभागाने नवी मुंबईत प्रथमच ‘डाक अदालत’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून 30 जून रोजी वाशी येथे या विशेष सुनावणीचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मूळ तक्रार नोंदवून सहा आठवडे उलटल्यानंतरही न सुटलेल्या प्रकरणांनाच या प्रक्रियेत प्राधान्याने घेतले जाणार आहे.
पत्रव्यवहार, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, बचत बँकेचे व्यवहार किंवा काउंटर सेवांशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी अनेकदा नागरिकांना विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. या पार्श्वभूमीवर विभागीय स्तरावर तक्रारदार आणि अधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न म्हणून डाक अदालतीची संकल्पना राबविण्यात येत आहे. नवी मुंबई विभागाच्या अखत्यारीतील टपाल कार्यालयांशी संबंधित प्रलंबित तक्रारींची या अदालतीत सुनावणी होणार आहे. नोंदणीकृत तसेच विनानोंदणीकृत पत्रे, स्पीड पोस्टचे विलंबित किंवा न मिळालेले लेख, मनी ऑर्डरची रक्कम न मिळणे, टपाल बचत बँकेतील अडचणी तसेच काउंटर सेवांशी संबंधित प्रश्न यांचा यात समावेश असेल. संबंधित तक्रारींबाबत प्रत्यक्ष सुनावणी घेऊन त्यावर निर्णय प्रक्रिया गतीमान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या अदालतीत सहभागी होण्यासाठी तक्रारदारांनी आपली तक्रार 15 जूनपर्यंत वरिष्ठ टपाल अधीक्षक, नवी मुंबई विभाग यांच्याकडे पाठवणे आवश्यक आहे. अर्जासोबत मूळ तक्रार दाखल केल्याची तारीख, तक्रारदाराचे नाव आणि संबंधित तक्रार यापूर्वी कोणत्या अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आली होती, याची माहिती देणे बंधनकारक आहे. अर्ज दोन प्रतींमध्ये सादर करावा लागणार आहे. टपाल विभागाच्या मते, नियमित तक्रार निवारण यंत्रणेत अपेक्षित तोडगा न निघालेल्या प्रकरणांसाठी ही प्रक्रिया उपयोगी ठरू शकते. त्यामुळे अनेक आठवड्यांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींना निर्णयाच्या दिशेने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डाक अदालत 30 जून रोजी सकाळी 11 वाजता वाशी मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीत आयोजित करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai